जाफराबाद : तालुका कॉंंग्रेस कमिटीमध्ये तालुका सरचिटणीसपदी राहुल गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल युवक कॉंंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस विजय सिंग, युवक कॉंंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, सुरेश गवळी आदींनी गवई यांचे स्वागत केले.
शांतता समितीची सिंधी काळेगाव येथे बैठक
जालना : तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी बीट जमादार दिलीप साळवे यांनी गावात शांतता राखून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी उमेदवारांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम
जालना : येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज़्युनिअर कॉलेजमध्ये ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ व ‘स्वामी विवेकानंद’ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्या लतिका मनोज यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. सुखदेव मांटे, अध्यक्षा रेवती मांटे, फरहा शेख, अमोल आधुडे, लक्ष्मी श्रीपत, वरुण अंबेकर, अन्सार सोलंकी आदींची उपस्थिती होती.
गुंज येथे विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप
घनसावंगी : तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील लक्ष्मणराव माधवराव जाधव विद्यालयात विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. दरम्यान, मधुकर कवडे यांनी राजेश टोपे यांच्यावर कविता वाचन केले. भिकन गाढे, मोहसीन सय्यद यांच्यासह दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी प्रतीक्षा भोसले हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. प्रभाकर शेळके, माणिक चौधरी, अभिमन्यू टोके आदींची उपस्थिती होती.