शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दोष सिध्दतेसाठी कठोर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:02 IST

दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील दोषसिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील दोषसिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये दिल्या. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात नियमित गस्त घालावी, रोडरोमिओंना चाप लावावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: शिस्तीच्या पोलीस खात्यात कामात कुचराई करणा-यांवर कारवाई केली जाईल, असा सक्तीचा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.सन २०१९ मध्ये दाखल गुन्हे, दोषारोपपत्र आणि गुन्ह्यांची सद्यस्थिती याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सर्वच पोलीस ठाण्याचे कामकाज आणि त्यातील कमतरता दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. चालू वर्षात २०२० मध्ये काम करताना पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी दाखल गुन्ह्यांमधील दोषसिध्दता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. न्यायालयात सुरू असलेल्या दैनंदिन कामकाजाची माहिती कोर्ट पैरवी कर्मचा-याकडून घ्यावी, साक्षीदार, वॉरंट, समसन्स आदींची माहिती घेऊन येणा-या अडचणींवर मार्गदर्शन करावे, आदी विविध सूचना देण्यात आल्या आहेत.शहरासह जिल्हाभरात प्रॉपर्टीबाबत दाखल होणा-या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करावे, समन्स, वॉरंटची वेळेत अंमलबजावणी करावी यासह इतर विविध सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. विशेषत: शिस्तीच्या खात्यात काम करताना कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही पोलीस अधीक्षकांनी या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत.कामकाजाचा आढावा : कामचुकारांवर केली जाणार कारवाईशहरी, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलीस पथकाने नियमित गस्त घालावी. शिकवणीच्या आवारात गस्त घालून संबंधित शिकवणी चालकांना दक्षतेबाबत सूचना द्याव्यात. तसेच मुले, मुली फिरण्यास जाणा-या पॉइंटवरही लक्ष ठेवण्यास सूचित करण्यात आले.पोलीस दल हे शिस्तीचे आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर कोणीही करणार नाही, याची अधिका-यांनी दक्षता घ्यावी. पोलीस ठाण्यात कर्तव्यात कसूर करणा-यांचा अहवाल तात्काळ द्यावा. कर्तव्यकसूर करणाºया अधिकारी, कर्मचा-यांना मुख्यालयाशी संलग्न केले जाईल, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीस