लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरातील अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधकारक असून, त्यांनी त्वरित परवाने घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवा ई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी लोकमतला दिली.अन्न व्यासायिकाकरिता भारतात अन्न सुरक्षा कायदा २००६ लागू करण्यात आला आहे. या काद्याअतंर्गत पान टपरी चालक, चहा कॅन्टीन चालक, रसवंती चालक, किरकोळ हॉटेल चालक, दुध डेअरी, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फिरते विक्रेत, गृहोद्योग, बेकरी, देशी किंवा विदेशी दारु विक्रेते, मास - मंच्छी विक्रेते, अनाज भांडार, आडते, कमिशन एजंट किराणा व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स यासह अन्य अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधनकारक आहे.परंतु राज्यातील काही अन्न व्यावसायिकांनी अद्यापही परवाने घेतले नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी नुकतीच मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील ज्या अन्न व्यावसायिकांनी परवाने व नोंदणी केल्याली नाही. त्यांच्यावर कडक कारवाईचे निदेश दिले असल्याचे देसाई यांनी सांगितले.त्यानूसार जिल्हाभरासह शहरातील अन्न व्यवसायिकांनी पंधरा दिवसाच्या आता परवाणे घ्यावे, अन्यथा ५ लाखाचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी त्वरीत परवाने घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.जालना शहर : विशेष मोहीम राबविणारजिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी अन्न औषधी प्रशासनाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष टिम तयार करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले.जिल्ह्यातील व्यावसायिकांनी त्वरीत परवाने काढावे व नोंदणी करावी, असे ही ते म्हणाले.
परवाना नसणाऱ्यांवर होणार कडक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:33 IST
जिल्हाभरातील अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधकारक असून, त्यांनी त्वरित परवाने घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवा ई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी लोकमतला दिली.
परवाना नसणाऱ्यांवर होणार कडक कारवाई!
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन : परवाने नूतनीकरणासाठी १५ दिवसांचा कालावधी