शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:50 IST

गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा तसेच शहरात रेशन दुकानातून गोरगरिबांसाठी वाटप करण्यासाठी आलेला गहू हा दर्जेदार नसून, तो पावसात भिजल्याने त्या गव्हाला दुर्गंधी येत असून, तो काळा पडला आहे. यामुळे कदाचित आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही भीती लक्षात घेता या गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.जालना जिल्ह्यात जवळपास तीन हजार ५०० मेट्रीकटन गव्हाचा साठा हा सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात रेशन दुकानांतून करण्यासाठी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. दरम्यान राजूर येथील एका रेशन दुकानात गव्हामध्ये रासायनिक घटक आढळून आल्याने तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने रास्तारोको आंदोलनही केले होते. यावेळी जालना शहर स्वस्तधान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार पंडित, शहराध्यक्ष मंजित कक्कड, शैलेश कक्कड, संकेत पाटील, मनोज जगधने, शाम वाघमारे, फहाद चाऊस, गणेश गूल्लापेल्ली, नंदलाल कक्कड, शाम वाघमारे, दत्ता यमुल, साबेर चाऊस, रवी जयस्वाल, दीलिप जयस्वाल, श्रीकीशन येमूल, विजय मोडे, शुभम बिडकर यांची उपस्थिती होती.जालना शहरातील जवळपास ३० दुकानांवर हा साठा वितरित करण्यात आल्याचे रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेऊन सांगितले. याची गंभीर दखल घेत खोतकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पुरवठा अधिकारी रिना बसय्ये यांनीही या बद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले.या संदर्भात राष्ट्रीय फुड अ‍ॅथोरेटीलाही बोलणार असून, केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याही कानावर ही बाब घालणार असल्याचे खोतकरांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरcollectorजिल्हाधिकारी