शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्याला जीआय मानांकन

By शिवाजी कदम | Updated: June 13, 2023 10:36 IST

मराठवाड्यातील आठ उत्पादनांना मिळेल नवीन ओळख

शिवाजी कदम, लोकमत न्यूज नेटवर्क, जालना: पैठणीला जीआय टॅग अर्थात भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर मराठवाड्यातील आठ उत्पादनांना जीआय टॅग मिळणार आहे. यामध्ये जालन्याची दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढा, तुळजाभवानीची कवडी माळ, श्री रेणुका मातेचे तांबूल पान यांचा समावेश आहे.

काही दिवसांत या उत्पादनांना जिओग्राफिकल इंडिकेश कार्यालयाकडून भौगोलिक मान्यता मिळणार आहे. या उत्पादनांच्या जीआय टॅगिंगला संमती देत असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.  दोन दिवसांपूर्वी जीआय कार्यालयाकडून उत्पादकांना पत्र देण्यात आले आहे.

ज्वारीला नवी ओळख

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाने दगडी ज्वारीला जीआय मानांकनासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मराठवाड्यासह देशात प्रसिद्ध असलेल्या कुंथलगिरी पेढ्यालादेखील तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे जीआयतज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.

ही आहेत आठ उत्पादने

भौगोलिक मानांकनाच्या यादीत मराठवाड्यातील आठ उत्पादनांचा समावेश होणार आहे. यामध्ये जालन्यातील दगडी ज्वारी, धाराशिव येथील कुंथलगिरी पेढा, तुळजापुरी कवड्याची माळ, नांदेडमधील माहूरच्या श्री रेणुका मातेचे तांबूल पान, लातूर जिल्ह्यातील पानचिंच, बोरसरी डाळ, कास्ती कोथिंबीर आणि मुरूड अडकित्ता यांचा समावेश आहे.

मागील वर्षी अठरा प्रस्ताव दाखल केले होते. तपासणीनंतर मराठवाड्यातील आठ उत्पादनांना जीआय कार्यालयाने तत्त्वत: मान्यता दिली. काही दिवसांत अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. मान्यतेनंतर वस्तूंचे किंवा पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी जीआय टॅग असणाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे  बनावट मालाला आळा बसण्यास मदत होईल. -गणेश हिंगमिरे, जीआयतज्ज्ञ, पुणे.

टॅग्स :Jalanaजालना