शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

चोरीचे मोबाईल जप्त, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:59 IST

वेगवेगळ्या ठिकाणांहून नामांकित कंपनीचे चोरून आणलेले मोबाईल विक्री करण्याच्या हेतुने रेल्वेस्थानक भागात ग्राहकांच्या शोधात असलेल्या एकाला मंगळवारी रात्री अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेगवेगळ्या ठिकाणांहून नामांकित कंपनीचे चोरून आणलेले मोबाईल विक्री करण्याच्या हेतुने रेल्वेस्थानक भागात ग्राहकांच्या शोधात असलेल्या एकाला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून सहा महागडे मोबाईल जपत केले. ज्यांची किंमत ७० हजार रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती एडीएस पथकाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली.गोपनीय माहिती मिळाल्यानुसार यशवंत जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून रेल्वेस्थानक भागात सापळा लावला. यावेळी विकास उर्फ खारट अशोक गायकवाड, (रा. लालबाग जालना) ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून सहा मोबाईल पंचासमक्ष जप्त केले आहेत. हे मोबाईल नेमके कोठून चोरून आणले, याची विचारपूस एडीएसकडून केली जात असून, त्यांच्याकडून आणखी मोबाईल चोरीचे प्रकार उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात आले.जुना जालन्यातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. त्या भागातूनही काही मोबाईल लंपास केल्याची कबुली गायकवाड यांनी दिल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या प्रकरणी आरोपीविरूद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत जाधव, जमादार ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे, आकाश कुरील यांनी यशस्वी केली.

टॅग्स :MobileमोबाइलThiefचोरArrestअटक