शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांची आढावा बैठक घेतली.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंपालाल शेवगण, सुनील जायभाये, सोपान बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अठरा पोलीस ठाणे प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.औरंगाबाद परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र सिंघल यांनी जालना येथे पोलिसांची आढावा बैठक घेतली.निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा बिघडविण्याचा प्रयत्न करण्याची भीती असते.यामुळे पोलिसांनी अशा गुंडावर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, बेकायदेशीर शस्त्र, दारुविक्री करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रमुखांना दिल्या.तसेच निवडणूक काळात कोणत्या गोष्टीना पहिले प्राधान्य द्यावे याविषयी सिंघल यांनी सांगितले. बीड येथे पूर्ववैमनस्यातून एका पक्षाच्या नगरसेवकाचा खून करण्यात आला आहे.अशा घटना जिल्ह्यात घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.पोलिसांचे कौतुकलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एडीएसच्या पथकाने जुगाराचे अड्डे, दारु अड्ड्यांवर छापे मारुन अनेकांवर कारवाई केली. तिघा जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन हर्सूल कारागृहात रवानगी केली. तसेच दोघा जणांवर हद्दपारीची कारवाई केल्याने सिंघल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले.जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कुठलीच विपरीत घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विपरीत घटना घडण्याची दाट शक्यता असते, यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna Policeजालना पोलीस