शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

By विजय मुंडे  | Updated: June 27, 2023 20:51 IST

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची केली होती

- फकिरा देशमुखभोकरदन : तालुक्यातील तळेगाव हे गाव दहा वर्षांपूर्वी फुलंब्री (जि.छत्रपती संभाजीनगर) मध्ये समाविष्ट झाले हाेते. परंतु, ग्रुप ग्रामपंचायतीतील तळेगाववाडी हे गाव भोकरदन आणि फुलंब्री तालुक्यातील महसूल विभागातून वगळण्यात आल्याने या गावातील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहत होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली असून, आयोगाच्या निर्देशानुसार भोकरदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील महसूलचे पथक मंगळवारी तळेगाव वाडी गावात चौकशीसाठी गेले होते.

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची मागणी राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे करीत मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राज्य मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार सारिका कदम, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांची समिती गठीत करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मंगळवारी हे पथक तळेगाव वाडी गावात दाखल झाले. त्यांनी ग्रामसभा घेऊन नागरिकांची मागणी, समस्या जाणून घेतल्या. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यावेळी फुलंब्रीचे नायब तहसीलदार अशोक कापसे, तलाठी आर.के.औताडे, ग्रामसेवक राजन हनवते व इतरांची उपस्थिती होती.

संभाजीनगर मध्येच समावेश करायावेळी आरेफ पठाण, स्माईल पठाण, सादेक पठाण, मुनिरखा पठाण, भुरेखा पठाण, माजितखा पठाण, रशीदखा पठाण आदींनी आमच्या तळेगाव वाडी-बिस्मिल्ला वाडी गावाचा समावेश फुलंब्री तालुक्यात (जि. संभाजीनगर) करावा, अशी मागणी समिती समोर केली.

गेवराई पायगाच्या सरपंचांचे उपोषण मागेतळेगाव वाडी गावातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी गेवराई पायगाचे सरपंच गणेश साबळे यांनी उपोषण सुरू केले होते. सरपंच साबळे यांनी अर्धनग्न होत, तोंडाला काळे लावून तळेगाववाडी ते तळेगाव असे बैलगाडीतून प्रवास करीत गांधीगिरी केली. फुलंब्री महसूल विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

लोकमतच्या वृत्ताची दखलतळेगाव वाडी गावातील समस्यांबाबत लोकमतने फुलंब्री येथून एक गाव दोन जिल्हयात, घर का ना घाट का या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे. त्यानुसार जालना व छत्रपती संभाजीनगरचे महसूल पथक कामाला लागले आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAurangabadऔरंगाबादJalanaजालना