अंकुशनगर (महाकाळा) : मराठा आरक्षण आंदोलनात जिवंतपणा आणण्याचे काम साष्टपिंपळगावकरांनी केले आहे. आंदोलनाचा हा वनवा आता राज्यभर पेटला असल्याचे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे अभ्यासक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केले.
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला कोंढरे यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आज मराठा समाजातील मुलांना उत्तम मार्क असतानाही संधी मिळत नाही. शैक्षणिक सुविधांपासून त्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचा हा निर्णायक लढा असून, यात प्रत्येक समाजबांधवाने जमेल तसे, जमेल तिथे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या नावाखाली राज्य सरकार पळवाटा काढून भरती करत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कोंढरे यांनी दिला. यावेळी आंदोलक ग्रामस्थ, महिला, मुलींची उपस्थिती होती.
फोटो