जालना : प.पू. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात ७ ते १९ जानेवारी दरम्यान अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.याचा प्रारंभ सोमवारी भव्य शोभा यात्रेने करण्यात आला. प्रारंभी पाठक मंगल कार्यालयात माधवानंद महाराजांना मुकुट अर्पण करण्यात आला. हा सोहळ्या पार पडल्यानंतर पाठक मंगल कार्यालय ते बजरंग दालमिलपर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेचे ठिकठिकाणी सडा-रांगोळी काढून तसेच फटाके फोडून शिष्य परिवा राकडून स्वागत करण्यात आले. यावेळी सहभागी भजनी मंडळ, घोडेस्वार आणि नामस्मरणाने शहर दुमदुमून गेले होते.
भव्य शोभायात्रेने कार्यक्रमांचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:38 IST