शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:50 IST

शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सोमवारी सकाळी सुरुवात झाली

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. नगरपालिका व पोलीस प्र्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत शहरातील विविध भागांतील १०९ ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक जागांवरील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. समितीला सर्वेक्षणात नवीन जालना व जुन्या जालन्यात एकूण सुमारे ४५० ठिकाणी धार्मिक स्थळांची अतिक्रमणे आढळून आली. पैकी १७ ठिकाणची अतिक्रमणे पालिकेने या पूर्वी मोहीम राबवून काढून टाकली. तर रहदारीस अडथळा न ठरणारी बहुतांश अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया राबवून नियमित केली आहेत. उर्वरित १०९ ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला सकाळी कडबीमंडी परिसरात मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्या उपस्थितीत मोठ्या फौजफाट्यात सुरुवात झाली. सदर बाजार झोन एक, झोन दोनमधील अतिक्रमणे सुरुवातीला हटविण्यात आली. त्यानंतर मुर्गीतलाव परिसरातील अतिक्रमणे पाडण्यात आली. शहरातील मोदीखान्यातील तीन, कन्हैयानगर भागातील सहा, छायीपुरा, चरवाईपुरा, मोदीखाना, कडबीमंडी, टाँगा स्टँण्ड, बन्सीपुरा, छप्परबन मोहल्ला, जवाहरबाग, काजीपुरा या भागात मुख्य रस्त्यालगत, अंतर्गत रस्त्यावरील एकूण १९ अतिक्रमणे पालिकेच्या कर्मचाºयांनी दोन जेसीबी, १२ टॅक्टरच्या मदतीने सायंकाळपर्यंत हटविल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिक्रमण हटविताना धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेण्यात आली. नगरपालिकेचे शहर अभियंता रत्नाकर अडसिरे, माधव जामदडे, स्वच्छता निरीक्षक पंडित पवार, संजय खर्डेकर, सॅमसंग कसबे, अशोक लोंढे, विलास गावंडे, संतोष शिरगुळे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, महादेव राऊत, बाळासाहेब पवार, योगेश गावंडे, नगर पालिकेचे सर्व सफाई कामगार, चारही पोलीस ठाण्यांतील कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. ही अतिक्रमण हटाव मोहीम आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे.