शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

उदयोन्मुख मल्लांना आवश्यक असणारे प्रायोजक ‘स्टार’ झाल्यानंतरच मिळतात : रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:02 IST

प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले आहे ते रुस्तुम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अमोल बुचडे याने.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला तरच खेळाडूंना प्रायोजक मिळतात; परंतु खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले आहे ते रुस्तुम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अमोल बुचडे याने.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १0 वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे अमोल बुचडे यांना वाटते.अमोल बुचडे याने २0१0 साली पंजाबच्या जरखड येथे रुस्तुम-ए-हिंदचा किताब पटकावला होता. तसेच याच वर्षी तो बारामती येथे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त तो येथे आला आहे. या वेळी त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला.प्रत्येकाची आंतरराष्ट्रीयपातळीवर प्रतिनिधित्वाची इच्छामहाराष्ट्रातील बरेच पहिलवान महाराष्ट्र केसरी किताब पटकावले की त्यावरच ब-याचदा समाधान मानतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याविषयी त्यांच्या मनात विचार येत नाही याविषयी छेडले असता तो म्हणाला, ‘‘आर्थिक स्थिती प्रतिकूल असणे, खेळण्यासाठी पोषक वातावरण नसणे आणि कौटुंबिक अडचण अथवा दुखापतीमुळे अनेक मल्लांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळ थांबवण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे एकदा महाराष्ट्र केसरी झाला की त्याच दर्जाची कामगिरी व्हायला पाहिजे ही मल्लाची इच्छा असते. फक्त महाराष्ट्र केसरी किताबावरच थांबण्याची त्याची स्वत:ची तशी कधीही वैयक्तिक इच्छा नसते. प्रत्येकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. आता ट्रेंड बदलत आहे. आता मल्ल फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावर समाधान मानत नाही. त्यांचे ध्येय हे तीनदा महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे. मीदेखील महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळलो.महाराष्ट्राला आॅलिम्पिकमध्ये मेडल मिळेलखाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिक मेडल मिळविण्याची धमक गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पधेर्तील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यात असल्याचेही अमोल बुचडे याने आवर्जून सांगितले.उदयोन्मुख खेळाडूंनाप्रायोजक मिळावेतखेळाडूंना योग्य वयात स्पॉन्सर्स मिळत नसल्याची खंतही अमोल बुचडे याला वाटते. तो म्हणाला, ‘‘एक दर्जेदार पहिलवान घडवण्यासाठी खूप आर्थिक खर्च असतो. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील पहिलवानांच्या खुराकासाठी किमान १ लाख व राज्य पातळीवरील पहिलवानांसाठी ५0 हजार व सर्वसाधारण पहिलवानांसाठी २५ हजार रुपयांचा खर्च लागतो. त्यामुळे ख-या अर्थाने प्रायोजकाचे साह्य पहिलवानांना आवश्यक असते; परंतु पहिलवान मोठा झाल्यानंतरच त्याला प्रायोजकत्व मिळते. वास्तविकत: उदयोन्मुख प्रतिभावान मल्लाच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी व त्यांचे बेसिक पक्के करण्यासाठी प्रायोजकाची गरज असते. तज्ज्ञ व मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच त्या खेळाडूला प्रायोजकत्व द्यायला हवे. मीदेखील माझ्या अकॅडमीत उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे अमोलने सांगितले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीJalanaजालना