शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गेमच्या नादात शेतीसह कारही विकली; जालन्यातील तरुणाने गमावले ४० लाख रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 08:28 IST

ऑनलाइन गेमच्या नादात एका युवकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना

जालना :

ऑनलाइन गेमच्या नादात एका युवकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जालना तालुक्यातील ढगी येथे उघडकीस आली आहे. परमेश्वर केंद्रे (वय ३७) असे त्या तरुणाचे नाव आहे. यासाठी त्याला एक एकर शेतीसह १७ लाख रुपयांची कारही विकावा लागली. याबाबत त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.   

परमेश्वरने दोन वर्षांपूर्वी मोबाइलमध्ये मॉस्ट बेट हा गेम डाऊनलोड केला होता. सुरुवातीला त्याने १०० ते १००० रुपयांपर्यंत पैसे लावले. त्यात तो जिंकत गेला. त्यानंतर २५ ते ३० लाख रुपयांची बेट लावली. त्याच्या खात्यावर पैसेदेखील आले. एकदा तर तो जवळपास ३९ कोटी २५ लाख ९१३ रुपये जिंकला होता. 

ते  पैसे काढण्यासाठी गेला असता, पैसेच निघाले नाही. त्याने सुरुवातीला स्वत:कडे असलेली १६ लाख रुपयांची कार विकून गेममध्ये पैसे भरले. गावात असलेली एकर शेतीही त्याने विकली.  

जिंकण्याचे आमिष पडले भारी एका परदेशी कंपनीने मॉस्ट बेट गेमची निर्मिती केली आहे. सुरुवातीला पैसे लावल्यानंतर दुप्पट पैसे मिळतात  या आमिषापोटी खेळणे सुरू करतात. नंतर गेमचे व्यसन लागते.

परमेश्वर केंद्रे या तरुणाची ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. त्याने कोणत्या बँकेतर्फे पैसे भरले आहेत, त्याचे स्टेटमेंट मागितले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. तरुणांनी गेमच्या आहारी जाऊ नये. - मारुती खेडकर, पोलिस निरीक्षक,  सायबर पोलिस ठाणे.