शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धान्याच्या आडून गुटख्याची तस्करी; शहागड येथे ३४ लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:42 IST

बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती.

ठळक मुद्देतब्बल २०७ गोण्यांमध्ये हा गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त केला

शहागड (जि.जालना) : बीडकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकवर गोंदी पोलिसांनी कारवाई करून ३४ लाख १५ हजाराचा गुटखा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी गहिणीनाथ नगर येथे करण्यात असून, या कारवाईत ट्रकसह तब्बल २०७ गोण्यांमधील गुटखा असा ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून गोंदी पोलिसांनी मंगळवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गहिणीनाथ नगर येथे सापळा रचून एका ट्रकवर (क्र. ए. के. ५६- ५४१३) कारवाई केली. या कारवाईत ३५ लाखाचा गुटखा व ट्रक असा एकूण ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनासह गुटखा शहागड पोलीस चौकीत लावण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासनामार्फत पंचनामा केला जाणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, फौजदार हनुमंत वारे, जमादार भास्कर आहेर, नारायण माळी, नितीन खरात, गिरी यांच्या पथकाने केली. 

ट्रकमध्ये सडक्या ज्वारीची पोतेपोलिसांनी कारवाई केली तरी पाहणीत त्यांना केवळ धान्य दिसावे यासाठी ट्रकमध्ये सडक्या धान्याचे पोते ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी इतर पोत्यांचीही तपासणी केल्यानंतर आतमध्ये गुटखा दिसून आला. तब्बल २०७ गोण्यांमध्ये हा गुटखा आढळून आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसraidधाडJalanaजालना