शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणापासून विधीमंडळात आमदारांचा राडा पाहतोय, सगळे एकाच माळेचे मणी: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:12 IST

मनोज जरांगेंची विधीमंडळात आमदारांच्या गोंधळावर टीका

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : तुमची इच्छाशक्ती असेल तर द्या न आरक्षण, उगा विरोधक आले नाही म्हणून एकमेकांवर बोलू नका, आम्हीं ही बघू आरक्षण कसं मिळवायच. विधीमंडळात लहानपणापासून या आमदारांचा राडा बघतोय. सरकार आणि विरोधक दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर केली. आज जालना येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जालनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी अंतरवाली सराटी येथे सकाळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, हैद्राबादवरून गॅझेट आणलं अशी माहिती शंभुराजे यांनी दिली आहे. मागेल त्या मराठ्याला कुणबी नोंदीच्या प्रमाणपत्र त्या आधारे द्यावे. आम्ही शंभुराजे यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व बांधवांची बैठक घेऊन २८८ जागांवर पाडायचे किंवा निवडून द्यायचे याचा निर्णय जाहीर करू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला. 

नुकसान झालं तर आता सहन करणार नाही

सगळीकडे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांनी देखील आता एकत्र यावे. जातीसाठी एकत्र या. जात प्रमाणपत्राची व्हॅलीडिटी दिली जात नव्हती. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही. याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करू नका आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही, ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. अधिकारी देखील जातीयवादी आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना