शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागरिकांच्या मदतीने पकडला चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:40 IST

एका घरात चोरी करून गच्चीवरील पाण्याच्या टाकीमागे लपून बसलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले.

जालना : एका घरात चोरी करून गच्चीवरील पाण्याच्या टाकीमागे लपून बसलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले. शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला.इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहणारे विजय कोल्हे कुटुंबियांसोबत बाहेर गेले होते. परत आल्यानंतर कोल्हे यांना घराची कडी बाहेरून तुटलेली दिसली. घर उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा आतून बंद असल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले. हा प्रकार कोल्हे यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितला. आजूबाजूच्या नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेला इन्कमटॅक्स कॉलनीत घरफोडी झाल्याची माहिती दिली. या वेळी शहरात गस्तीवर असलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर पथकासह इन्कमटॅक्स कॉलनीत पोहोचले. पोलिसांनी आतून बंद असलेला दरवाजा तोडला. घरात कुणीच आढळले नाही. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आजूबाजूच्या घरांच्या छतावर पाहणी सुरू केली. या वेळी कोल्हे यांच्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीमागे एक जण अंधाराचा फायदा घेऊन लपून बसल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. शेख छोटू शेख दिलावर (३७, रा.पिंपळगाव बाग, ता. गेवराई,जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून, झडतीमध्ये त्याच्याकडे चोरलेला एक मोबाईल व ४१०० रुपये आढळून आले. या प्रकरणी विजय कोल्हे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शेख छोटू यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, सदाशिव राठोड, सोमीनाथ उबाळे, समाधान तेलंग्रे, वैभव खोकले, सचिन चौधरी, योगेश जगताप, विलास चेके यांनी ही कारवाई केली.