शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवाडीत रंगला श्रीराम जन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:47 IST

शहरासह जिल्ह्यात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. येथील आनंदवाडी श्रीराम मंदिरात पालकमंत्री बबनराव लोणीकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी जन्मसोहळा साजरा करण्यात आला.यावेळी श्रीराम मंदिराचे प्रमुख रामदास महाराज आचार्य यांनी राम जन्मोत्सवाचा सोहळा प्रवचनातून उपस्थितांसमोर मांडला. भाविकांना राम जन्माचे महत्त्व तसेच प्रभू रामचंद्रांचे कार्य या विषयावर सविस्तर विवेचन केले. दुपारी बारा वाजता रामभक्तांच्या अलोट गर्दीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. नवीन जालन्यातील शेलगावकर, तसेच जुन्या जालन्यातील गवळी मोहल्लास्थित सागर देशमुख यांच्या राम मंदिरात परंपरागत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. गवळी मोहल्ल्यातीलच पक्षराज यांच्या राम मंदिरातही दुपारी जन्मोत्सव परंपरागत उत्साहात पडला. यावेळी रामनगर तसेच बडीसडकवरील राम मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.येथील पंडित मनोज महाराज गौड यांनी जन्मोत्सवावर विशेष प्रवचन दिले. एकूणच गुलाल आणि फुलांची उधळण करत भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. आनंदवाडी राम मंदिरात जन्म सोहळ्या नंतर परिसरातून पालखी मिरणूक काढण्यात आली होती. गेल्या सप्ताहभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साही वातावरणात पडले. रणरणत्या उन्हात भाविकांची राम जन्म सोहळ्यास मोठ्या संख्येने हजेरी लावली. महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामीण भागातही रामजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरcultureसांस्कृतिकJalanaजालना