जालना : जालना शहरातील कचेरी रोडचे काही वर्षांपूर्वीच काम करण्यात आले आहे. परंतु, सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत.
प्रभारीपदी यादव
जालना : येथील बलिराम यादव यांची हिंदू वाहिनीच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष अतुल मिश्रा यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडीचे स्वागत होत आहे.
मागण्यांचे निवेदन
जालना : शहरातील मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासभेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
कारवाईची मागणी
भोकरदन : शहर परिसरात अवैधरित्या दारूविक्री वाढली आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ झाली आहे. तळीरामांमुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सिग्नलकडे दुर्लक्ष
जालना : शहरात मामा चाैक, शनिमंदिर येथे सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. परंतु, वाहनधारक सिग्नल तोडत असल्याने वाहतूक ठप्प होत आहे.