शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

थरकाप उडवणारी घटना; १४ वर्षीय मुलीने ब्लेडने वार करून चिमुकल्या बहिणीचा केला खून

By दिपक ढोले  | Updated: November 28, 2022 17:34 IST

बाथरूममध्ये केले ब्लेडचे वार, आतून चिमुकली ओरडत होती तर बाहेर तिची हतबल आई दरवाजा उघडण्याची आर्जव करत होती

जालना : एका १४ वर्षांच्या चुलत बहिणीने ब्लेडने वार करून पाच वर्षांच्या चिमुकलीचा बाथरूममध्येच खून केल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील चौधरीनगर येथे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ईश्वरी रमेश भोसले (५ वर्षे, रा. चौधरीनगर) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. 

ईश्वरीचे आई - वडील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे राहतात. शिकण्यासाठी आई - वडिलांनी तिला जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणाऱ्या काकाकडे पाठविले होते. काही दिवसांपूर्वीच तिचा घराजवळच असलेल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश झाला होता. तिचे काका - काकू तिला दररोज शाळेत सोडत होते. सोमवारी सकाळी ईश्वरीचे काका गणेश भोसले हे घनसावंगी येथे गेले होते. घरी काकू मीरा भोसले, १४ वर्षांची बहिणी व एक लहान मुलगा होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ईश्वरी ही आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली, तर तिची काकू मीरा भोसले या स्वयंपाक करीत होत्या. तेवढ्यात तिची चुलत बहिणी बाथरूममध्ये गेली. तिने आतून कडी लावून ईश्वरीच्या चेहरावर, मानेवर, हातावर व गळ्यावर ब्लेडने वार केले. 

तेवढ्यात ईश्वरीचा आवाज आला. तिच्या काकूने बाथरूमकडे धाव घेतली. लहान मुलगाही रडत होता. परंतु, दरवाजा लावलेला असल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. काही वेळाने त्या अल्पवयीन मुलीने दरवाजा उघडला. त्यानंतर शेजारच्या एका तरूणाने ईश्वरीला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि. संभाजी वडते, वसंत धस, कृष्णा भंडागे, किशोर जाधव, सय्यद मजिद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ईश्वरीला ठार करून तिने ब्लेड टॉयलेटच्या भांड्यामध्ये टाकून दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना