शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीचा थकबाकीदारांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:53 IST

वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले होते. एकाच दिवशी जवळपास दहा लाख रूपयांपेक्षा अधिकचे वीजबिल वसूल झाल्याची माहिती मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिली.जालना शहर व जिल्ह्यात वीज घरगुती तसेच व्यावसायिक वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रूषयांची थकबाकी आहे. ती वसूल व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीने यापूर्वीही त्यांना नोटीस देऊन ती थकबाकी भरावी म्हणून सूचना केली होती. मात्र ग्राहक थकबाक भरण्यास या ना त्या कारणाने चालढकल करत असल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपीनच्या व्यवस्थापनाने आता वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांना कॅबिन सोडून रस्त्यावर उतरून ग्राहकांकडून वीज बिल वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान शनिवारी केलेल्या कारवाईत औद्योगिक वसहातीतील २६ वीज कनेक्शन तोडली असून, त्यांच्याकडून ८ लाख ७८ हजार रूपये वसूल केले आहेत. तर व्यावसायिक वीज वापर करणा-यांचे जवळपास ९५ वीज जोडणी तोडली असून, त्यांच्याकडून ९ लाख ५९ हजार रूपये वीज बिल भरून घेतले. तसेच घरगुती वापारच्या जवळपास १५८ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तोडला असून, त्यांच्याकडून १५ लाख रूपये वसूल केल्याची माहिती अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांनी दिली.कारवाईने खळबळशनिवारी वीज वितरण कंपनीचे जे भरारी पथक वीज ग्राहकांच्या घरी दाखल झाल्यावर एकच गोंधळ उडाला. अनेकांनी साहेब आमच्याकडे पैसे नसल्याचे कारण पुढे केले तर, काहींनी वीज मीटरमध्ये एक रिडींग आणि बिलावर दुसरी रिडींग येत असल्याच्या तक्रारी अधिका-यांकडे केल्याने अधिका-यांनी याची गंभीर दखल घेतली जाईल असे सांगण्यात आले. या वीज वितरणच्या कारवाईची दिवसभर शहरात उलट-सुलट चर्चा होती.यातून ३० लाख जमा झाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल