शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निवडणुकीसाठी शिवसेनेची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:11 IST

स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या दौ-याचा अहवाल नेत्यांना २८ फेब्रुवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करावा लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने या जिल्ह्यासह राज्यातील विधानसभा मतदार संघांत याची चाचपणी सुरु केली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांना पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्या-त्या जिल्ह्यातील मतदार संघात ३९ मुद्यांवर पक्षनिरीक्षक काम करीत आहेत. पक्षस्थिती, गावे, शाखांबाबत माहिती, लोकांचे मत, शिवसेनेने शेतक-यांसाठी केलेली विविध आंदोलने, जनमत संघटीत होऊ शकेल अशी तीन ज्वलंत प्रश्न पाहायचे, बुथ प्रमुखांच्या निवडी आदी मुद्यांचा पक्षनिरीक्षक अभ्यास करीत आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे याचीही चाचपणी विविध विधानसभा मतदार संघांत नेत्यांकडून केली जातआहे.२१ ते २३ फेब्रुवारी या काळात जबाबदारी दिलेल्या मतदार संघात चाचपणी केली जात आहे. या चाचपणीचा परिपूर्ण निरीक्षण अहवाल पक्षनिरीक्षक २८ फेब्रुवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.जालना जिल्ह्यात गणेश लटके यांना जालना, भोकरदन आणि बदनापूर या विधानसभा मतदार संघात पक्षनिरीक्षक म्हणून नेमले आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्याकडे परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही नेते जालना जिल्ह्याच्या दौ-यावर असून, पक्षाची सद्यस्थिती जाणून घेत लोकांच्या भेटी आणि राजकीय वातावरण याबाबत निरीक्षण हे नेते करीत आहेत.जिल्ह्यातील शिवसेनेची परिस्थिती आणि लोकांचे मत याचा वरिष्ठ पातळीवर अभ्यास केला जाणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.अंबेकर, बोराडे, चोथेंकडे हे मतदार संघ..संपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांच्याकडे नेवासा, श्रीरामपूर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्याकडे संगमनेर, शिर्डी आणि अकोले, तर ए.जे.बोराडे यांच्याकडे सोलापूर (पूर्व), बार्शी आणि मोहोळ या विधानसभा मतदार संघांची पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.