शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

शिवघोषाने जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 01:26 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले

जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात अनेक शिवप्रेमी तरुणांसह युवतींचाही लक्षणीय सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जालना शहरासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणुका काढण्यात आल्या.: जालना शहर व जिल्ह्यामध्ये शिवजयंतीनिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वत्र उत्साह दिसून आला. जुना जालना भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शिवप्रेमी तरुणांनी वाजतगाजत मोटारसायकल रॅली काढली होती. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.शहरातील विविध संस्था, संघटनांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक केला. संभाजी उद्यानापासून काढलेल्या रॅलीचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. सायंकाळी सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गांधी चमन येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीजे न लावता ढोल पथक तैनात करण्यात आले होते. त्यासाठी औरंगाबाद येथील ढोल पथकातील तरुण व युवतींनी लयबध्द चाल देऊन मिरवणुकीत चैतन्य निर्माण केले होते. मिरवणुकीत गणेश सुपारकर मित्रमंडळाच्या वतीने मल्लखांबचा चमू सहभागी झाला होता. या मल्लखांबावर युवकांनी केलेल्या कसरतीला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. अनेक युवक-युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉ जिजाऊ तसेच संभाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. दरम्यान, मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना विविध संघटनांच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली होती. मिरवणुकीच्या स्वागतासाठी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.गांधी चमन येथील कार्यक्रमात माजी मंत्री अर्जुन खोतकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी केलेले कल्याणकारी राज्य ही आजही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले याचवेळी त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांवरचे जे चित्रण सध्या प्रसारित केले जात आहेफ ते मनाला न पटणारे आहे. एका राजाचे असे चित्रीकरण पाहताना मन हेलावून जात आहे. या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंकुशराव राऊत, समितीचे अध्यक्ष रवी राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, कोषाध्यक्ष सतीश जाधव, सचिव अ‍ॅड. रवींद्र डुरे, सहसचिव सागर देवकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, राजेंद्र राख, अक्षय गोरंट्याल, शीतल तनपुरे, विमल आगलावे, राजेश राऊत, गणेश राऊत, किरण गरड, मिर्झा बेग आदींची उपस्थिती होती.जालना : शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये बुलेटवर स्वार झालेल्या युवतींनी फेटे बांधून भगवाध्वज फडकावल्याने वातावरण उत्साही होते.परतूर : परतूर व परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये जालना येथील गोविंद गर्जना ढोल पथकाने लयबध्द ताल सादर करुन उत्साह भरला होता.जाफराबाद : जाफराबादसह परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला भजनी मंडळानी सर्वांचे लक्ष वेधले होते.भोकरदन : शहरासह आव्हाना येथे शिवप्रेमींनी मिरवणुकीत वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. आव्हाना येथे शिवशाहीचा देखावा सादर केला.बदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.अंबड : अंबड शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोठी गर्दी होती.मंठा : शहर व परिसरात जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.घनसावंगी : घनसावंगीसह तालुक्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. महिलांचाही मिरवणुकीतील सहभाग लक्षणीय होता.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिकShivjayantiशिवजयंती