शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची 'पॉवर' पाठिशी; बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादेत

By विजय मुंडे  | Updated: June 7, 2023 12:22 IST

बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांना बळ देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट जाफराबादेत

जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत जाफराबादच्या नगराध्यक्षा. डॉ. सुरेखा लहाने यांनी त्यांच्यावर झालेल्या राजकीय आरोपांचा पाढा वाचत अश्रुंना वाट मोकळी केली होती. त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार थेट जाफराबादेत दाखल झाल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

जाफराबादच्या नगराध्यक्षा. डॉ. सुरेखा लहाने यांच्यावर काही दिवसांपूर्वी विविध आरोप करीत अविश्वास ठराव दाखल झाला होता. यावरून चांगलेच रणकंद माजले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशी अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या अनुषंगाने बैठक झाली होती. या बैठकीत सुरेखा लहाने या जाफराबादेत घडलेल्या प्रकार सांगताना भावूक झाल्या होत्या. कार्यकर्ती भावूक झाल्याचे पाहताच दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी खा. पवार यांनी जाफराबाद शहर गाठून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपण कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठाम असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आ.राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, माजी खा. जयसिंग गायकवाड, माजी आ.संजय वाघाचौरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष निसार देशमुख व इतरांची उपस्थिती होती.

चांगले काम करणाऱ्यांना जनतेची साथ मिळतेजाफराबादेत जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिला आहे. परंतु, विरोधकांकडून सत्तेचा आणि पैशाचा दुरूपयोग येथे सुरू असल्याचे दिसते. नगराध्यक्षा डॉ.सुरेखा लहाने उत्तम काम करत असताना नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. आम्ही अनेक वर्ष सत्तेत होतो. मात्र सत्ता आम्ही अंगात येऊ दिली नाही. सत्ता येते जाते. मात्र चांगले काम करणाऱ्यांना जनतेची साथ मिळते. याचा विचार करून कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे, असा सल्ला खा. पवार यांनी यावेळी दिला.

राज्यातील सत्ताधाऱ्यांना घाबरणार नाही नगरपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना कितीही दबाव आला तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहणार आहे. राज्यातील सत्तधारी पक्षाने नगरसेवकांना हाताशी धरून सुरू केलेल्या राजकारणाला आपण घाबरणार नाही, असे नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalanaजालनाRajesh Topeराजेश टोपेNCPराष्ट्रवादी काँग्रेस