शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची जादूची कांडी फिरली अन् अडीच वर्षांची बोनस सत्ता मिळाली: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 18:10 IST

नवीन सरकारला अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे.

- श्याम पाटीलसुखापुरी (जि. जालना ): सध्या राज्यात  राजकीय पेच निर्माण झालेला असून, नव्याने स्थापन झालेल्या सरकारला कायदेशीर बाबीला सामोरे जावे लागणार आहे. शरद पवारांनी जादूची कांडी फिरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्षे बोनस म्हणून सत्ता मिळाली होती, अशा शब्दात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील विकासकामांच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.

मंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपण सुखापुरीत बारा ते तेरा कोटी रुपयांची कामे मंजूर केली होती. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली असून, काही प्रगतीपथावर आहे. मंत्री असताना विकास कामे अधिकच जोमाने केले. आता मी आमदार असलो तरी विकासकामे थांबणार  नाहीत,अशी ग्वाही टोपे यांनी दिली. 

तसेच सध्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, नवीन सरकारला अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे. आपल्याला आतापर्यंत मिळालेली अडीच वर्ष ही बोनस म्हणून मिळालेली होती. पवार साहेबांनी जादूची कांडी फिरवली अन् ही अडीच वर्षांची सत्ता मिळाली, असेही टोपे म्हणाले. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, सुखापुरीचे सरपंच भगवान राखुंडे, प्रताप राखुंडे, रईस बागवान, बाळू गाडे, दीपक राखुंडे, दिलीप खोजे, फकीर मोहम्मद बागवान तसेच परिसरातील नागिरक मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajesh Topeराजेश टोपेJalanaजालना