धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील नवनिवार्चित ग्रामपंचायत सदस्य धनंजय तबडे यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ, प्रा. अमित राजपूत, सुनिल बोराडे, अरविंद तबडे, खुशवंतसिंग डोभाळ, अजय फिरके, प्रमोद जोशी, सुभाष लोदवाळ आदींची उपस्थिती होती.
------------------
फोटो
नानाभाऊ पटोले यांच्या निवडीबद्दल जल्लोष
जालना : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी नानाभाऊ पटोले यांची, तर उपाध्यक्षपदी कैलास गोरंट्याल यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल जालन्यात जल्लोष करण्यात आला. कॉंग्रेसच्या पदाधिकाºयांनी मिठाई वाटप व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी नाना पटोले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अॅड. राम कुºहाडे, जि.प. सदस्य राम सावंत, सचिन कचरे, जयराम कदम, अर्जुन घोंगडे, जिल्हाध्यक्ष संतोष खरात, प्रवीण रत्नपारखे, भागवत घाटे, कृष्णा चव्हाण, प्रकाश गावडे, राहुल गावडे, उत्तम बळप, कृष्णा भागवत, महेंद्र रत्नपारखे, लक्ष्मण कुºहाडे आदींची उपस्थिती होती.
------------------
फोटो
वालसावंगी येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
वालसावंगी ; भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती हिवरकर, उपाध्यक्षा वनिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक अजहर पठाण यांनी उपस्थितांना सदर योजनेची माहिती दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी शेवाळे, सोनुने, गवळी, सपकाळ, गवळी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक कलीम हारून यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
------------------
फोटो कालच्या चारमध्ये
सीए परीक्षेत विद्यार्थिंनीचे यश
अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मनिषा रामेश्वर उबाळे व दिशा बजरंग जहागीर यांनी सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल डॉ. शिवशंकर घुमरे यांनी विद्यार्थिनींचा सत्कार केला. या प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. पांडुरंग काळे, क्रीडा प्रमुख डॉ. प्रशांत तौर, कार्यालयीन अधीक्षक पांडुरंग गहिरे, प्रा. दीपक राखुंडे, प्रा. राजेंद्र पठाडे, प्रा.गणेश गुजांळ, बालासाहेब उगले आदींची उपस्थिती होती.
------------------
फोटो
हस्तपोखरी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अमोल जाधव, डॉ, रुचा टकले, परिचारिका रेखा राठोड, फार्मासिस्ट छाया काकड, मुख्याध्यापक एल.आर. जाधव, एन.टी. राजपूत, पी.व्ही. बुलबुले, डि.बी.कुरील, ए.एम.डोरले, बी.एन. सरोदे, बी.टी कोळी, पी.एस.बोडखे आदींची उपस्थिती होती.
फोटो
अध्यक्षपदी अमोल पाखरे, तर सचिवपदी अनिल लोखंडे
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पारध येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अमोल पाखरे तर सचिवपदी अनिल लोखंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी हस्तीमल बंब, गणेश लोखंडे, प्रा. संग्राम देशमुख, देवेंद्र पाटील, सुभाष तबडे आदींची उपस्थिती होती.