फोटो
जालना : मंठा तालुक्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आली. खांबेवाडी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू बिरादार व मिथुन चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन मिसाळ, ग्रामस्थ संचित चव्हाण, अंगणवाडी कार्यकर्ती शशिकला पवार आदींची उपस्थिती होती.
सुशील घायाळ यांची सहसचिवपदी निवड
मंठा : येथील सुशील घायाळ यांची युवासेना तालुका सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर युवासेना विभाग प्रमुखपदी महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, युवासेना जिल्हा अधिकारी भाऊसाहेब घुगे यांच्या सूचनेवरून करण्यात आली. यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी दीपक बोराडे, तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे, शहरप्रमुख किरण सूर्यवंशी, युवासेना उपतालुकाप्रमुख अशोक घारे, अजय नरोटे, संदीप वायाळ, उपशहरप्रमुख युनूस कुरेशी, आकाश मोरे, कृष्णा वरणकर, संतोष शेंडगे, विक्की गिराम, भागवत चव्हाण उपस्थित होते.
आदर्श शिक्षक सोनुने यांचा सेवापूर्ती गौरव
टेंभुर्णी : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक एकनाथ सोनाजी सोनुने नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने जाफराबाद तालुका शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला. शिक्षक सोनुने हे टेंभुर्णीजवळील पांगरी येथून सेवानिवृत्त झाले. यावेळी जाफराबादचे शिक्षण विस्तार अधिकारी राम खराडे, विलास घुगे, बद्री जायभाये, शाम खांडेभराड, पांडुरंग मगर, भगवान खरात, भाग्यवान झोरे, गुठे आदींची उपस्थिती होती.
वाहून जाणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडले
फोटो
शहागड : अंबड तालुक्यातील शहागड - पैठण रोडवरील चाँद - सूरज नाल्याला शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या रस्त्यावर पूल नसल्याने रविवारी सकाळी दुचाकीवरून पडलेली महिला वाहून जात होती. तेवढ्यात नागरिकांनी त्या महिलेला पकडले.
शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. शहागड ते पैठण मार्गावरील चाँद - सूरज नाल्यालादेखील पूर आला होता, असे असतानादेखील दुचाकी व चारचाकी वाहनचालक पाण्यातून मार्ग काढत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच दुचाकीवरून जात असताना महिला खाली पडली. ती महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना नागरिकांनी पकडले.
चितळी पुतळी येथे शिक्षकांचा सत्कार
जालना : चितळी पुतळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने बाबुराव पवार, विजय पितळे, गणेश खरात यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी अरूण जाधव, पी. डी. चव्हाण, शिवाजी उरदुखे, शिवाजी बुरकूल, दिनेश बुरकूल, अंकुश काकडे आदींची उपस्थिती होती.
जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ठोंबरे
फोटो
जालना : जुनी पेन्शन हक्क संघटनेेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत बदनापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी कपिलेश्वर ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.
जालना येथे आयोजित बैठकीमध्ये जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच संघटना वाढीसाठीही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थितांच्या निर्णयानुसार बदनापूर तालुक्याची कार्यकारिणी यावेळी गठीत करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी कपिलेश्वर ठोंबरे यांची एकमताने निवड करण्यात आली, तर उर्वरित तालुका कार्यकारिणीत तालुका सचिवपदी विशाल शिरसाठ, कार्याध्यक्षपदी दिनेश पघळ, कोषाध्यक्षपदी गणेश चाटे यांची निवड करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा संघटक उमेश जोशी, गणेश जऱ्हाड, गणेश शिनगारे, गणेश वानखेडे, रवी मेहत्रे, विलास गिराम यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.