शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केदारखेडा, कानडी येथे नदीपात्राची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:28 IST

पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथिल पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.पूर्णच्या नदीपात्रातील वाळूची अद्यापही लिलाव झालेला नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून नदीपात्रातून ट्रॅक्टरव्दारे वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम भरदिवसा वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ या वाळूची भरदिवसा वाहतूक केली जात आहे़ परंतु याकडे महसूल विभागाचे किंवा पोलीस खात्याचे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी ढुंकूनही पाहायाला तयार नाही़ यावरुन संबधित अधिकाऱ्याचे व वाळू माफियांचे आर्थिक हितसंबध असल्याची चर्चा सर्वसामन्यात सुरु आहे़ भर दिवसा सुरु असलेली वाळूची तस्करी अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना यात लक्ष घालावे कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यामुळे मात्र पूर्णा नदीचे पात्र पोखरले जात आहे़ यामुळे पर्यावरणाचा मोठा -हास होत आहे. असूनही याकडे सोयीस्कर होत असलेला कानाडोळा महसूल व पोलीस खात्याच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहे़ग्रामस्थांची जिल्हाधिका-यांकडे तक्रारतळणी : मंठा तालुक्यातील कानडी, लिंबखेडा , टाकळखोपा, वाघाळा, किर्ला, देवठाणा, भुवन येथील स्थानिक वाहनधारक थेट पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचे वाळूचा साठा करून वाळूची विक्री करण्यात येत आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारी ग्रामस्थांनी जिल्हाधिका-याकडे निवेदनाव्दारे केली आहे.विशेष म्हणजे वाळूची चोरी व साठवण करणा-या वाहनधारकांवर तलाठी , मंडळ अधिका-याबरोबरच वरिष्ठ अधिकारीही मेहेरबान असल्याचक तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक वाहनधारक नदीत उतरविण्यासाठी रस्ते तयार करुन लिलाव न झालेल्या ठिकाणाहून अवैधरीत्या वाळू उपसा, चोरी व साठा करीत आहे.हा सर्व प्रकार तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदाराना ज्ञात असतानाही महसूल विभाग वाळूमाफियांवर मेहेरबान का ? अवैध वाळूच्या उपशाकडे दुर्लक्ष का ? सगळं काही उघडपणे सुरु असूनही तेरी भी चूप मेरी भी चूप का ? हेच सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी वारंवार तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी रंगनाथ लोमटे, विष्णू राऊत, सुरेश चट्टे, वसंत सरोदे, आत्माराम जाधव यांनी केली आहे.यावर आता काय निर्णय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :sandवाळूcollectorजिल्हाधिकारी