प्रवीण खैरे यांची निवड
बदनापूर: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून प्रवीण खैरे यांची इंटरनॅशनल सायंटिस्ट अॅवाॅर्ड २०२१ करिता इंजिनिअरिंग, सायन्स व मेडिसीन या गटातून निवड झाली आहे. या पुरस्काराचे वितरण ६ व ७ मार्च रोजी वास्को द गामा (गोवा) येथे करण्यात येणार आहे. खैरे हे मूळचे बदनापूर येथील रहिवासी आहेत. त्यांना या अगोदर शिक्षण व संशोधन विभागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल नऊ पुरस्कार मिळालेले आहेत.
कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होतोय परिणाम
जालना : बर्ड फ्लूच्या धास्तीने सध्या जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांचे कुक्कुटपालन धोक्यात आले आहे. बर्ड फ्लू जिल्ह्यात नाही, प्रशासनाकडूनही दखल घेतली आहे. यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये, असे आवाहन ब्रुडर मॅन्स पोल्ट्री सर्व्हिसेसचे डॉ. फय्याज खान यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
केंद्राचे उपक्रम समाजासाठी कल्याणकारी : शेलगावकर
जालना : जगातील वातावरण सध्या दूषित झालेले आहे. येणाऱ्या भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित बालसंस्कार शिबिर व इतरही उपक्रम समाजासाठी कल्याणकारी आहेत, असे प्रतिपादन नरिमननगर येथे आयोजित एकदिवसीय बाल संस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्रीराम वाचनालयाचे ग्रंथपाल श्याम शेलगावकर यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख मीरा ढवळे, सुभाष घारे, प्रल्हाद बिल्हारे, जीवन झिंजुर्डे, इच्छाराम पाटील आदी उपस्थित होते.