शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार बनावट पॅकिंग पॉकेट्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:41 IST

बनावट कपाशी बियाणे प्रकरणी केलेल्या कारवाईचे धागेदारे ेथेट गुजरातपर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बनावट कपाशी बियाणे प्रकरणी केलेल्या कारवाईचे धागेदारे ेथेट गुजरातपर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे. अहमदाबाद येथून बनावट पॅकिंग पॉकेट्सचा पुरवठा करणाऱ्या संशयित मुकुंद रमनलाल पटेल यास पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास दोन मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील अन्य चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखा व कृषी विभागाच्या पथकाने दि. १९ एप्रिलरोजी जुना जालन्यातील कचेरी रोड परिसरातील कल्पेश शांतिलाल टापर याच्या घरात छापा टाकून ६४ लाख, ४२ हजारांचे कपाशी व भाजीपाल्याचे बनावट बियाणे जप्त केले होते. बनावट बियाणे विक्री प्रकरणात सहभाग असणा-या संशयित बाबासाहेब प्रल्हाद वाढेकर (रा. जामवाडी) व हरिदास बाजीराव निहाळ (रा. चनेगाव) यांनाही पोलिसांनी जामवाडी व चनेगाव येथून ताब्यात घेतले होते. तर बदनापूर तालुक्यातील चिखली येथून संशयित बबन धोंडिबा कदम (५५) नऊ लाखांच्या बनावट बियाण्यांसह अटक करण्यात आली होती. चारही संशयितांना न्यायायलाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. चौकशीत टॉपर याने बियाणे पॅकिंगसाठी लागणारी नामांकित कंपन्यांची हुबेहुब दिसणारी पॉकिटे गुजरातमधील अहमदाबाद येथील संशयित मुकुंद रमनलाल पटेल (३७) याच्याकडून आणल्याचे सांगितले. या पाकिटांवर किंमत व अन्य माहिती छापली जात होती. गुन्हे शाखेच्या एका पथकाने थेट अहमदाबाद येथे जावून मुकुंद पटेल यास ताब्यात घेतले. त्याच्या घराशेजारीच असलेल्या कार्यालयातून पोलिसांनी सहा हजार ३९० बियाणे पॅकिंगसाठी लागणारी पाकिटे जप्त केले. पाकिटावर कुठल्याही कंपनीचे नाव नसले तरी रंग व आकार हुबेहुब नामांकिंत कंपन्यांच्या बियाणे पॉकिटांसारखाच आहे. पोलिसांनी संशयित पटेल यास शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास दोन मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मूळ बनावट बियाणे कोठून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत.दरम्यान, या प्रकरणी शुक्रवारी पोलीस कोठडी संपत असलेल्या वरील चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केलेला संशयित मुकुंद पटेल हा कपाशी व अन्य बियाणे पॅकिंगसाठी लागणारी पॉकिटे तयार करणा-या एका कंपनीत काम करत होता. त्यामुळे त्याला पाकिटांचा आकार रंगछटा व अन्य बाबींची बारकाईने माहिती होती. त्यातुनच तो इतरांच्या मदतीने बनावट पॅकिंग पॉकिटे तयार करत असावा, असा संशय आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे बियाणे पॅकिंगची पॉकिटे हैदराबाद, अहमदाबाद व गोवा येथील कंपन्यांमध्ये केवळ आॅर्र्डरनुसारच तयार करून दिली जातात.

टॅग्स :Crimeगुन्हाAgriculture Sectorशेती क्षेत्र