शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर तालुक्यातील दोन मंडळांमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 13:01 IST

Rain in Jalana : तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प भरण्याच्या मार्गावर

बदनापूर - तालुक्यातील रोशनगाव व बदनापूर महसूल मंडळांमध्ये यावर्षी दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात मंगळवारी सर्वत्र धुवांधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील कापूस, मका, सोयाबीन, बाजरीसह खरीप पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनी सुद्धा खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी रोडचे नुकसान झाले आहे तालुक्यात दि २१ सप्टे रोजी ३१० मीमी पाऊस झाला. त्यामध्ये रोषणगाव मंडळ १०२ मीमी, बदनापूर मंडळ ७५ मीमी, शेलगाव मंडळ ४१ मीमी, दाभाडी मंडळ ५६  मीमी, बावणे पांगरी मंडळात ३६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. 

मंगळवारी तालुक्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. धरणात मंगळवारी सकाळी साडे बारा फूट पाणी आले होते. पाण्याची आवक सुरूच असून हे धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. भाजपा युवा मोर्चाचे ता उपाध्यक्ष व धोपटेश्वर चे माजी सरपंच नंदकिशोर शेळके म्हणाले की रोशनगाव मंडळामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर अशी नुकसानभरपाई द्यावी. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी. 

तालुक्यातील अंबडगाव येथील उपसरपंच राजेश जऱ्हाड म्हणाले की, मंगळवारी या परिसरात आतापर्यंत सर्वात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील उत्पन्नाच्या उरल्यासुरल्या आशा संपल्या आहेत. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने विम्याची मदत द्यावी. गेल्या आठ दिवसापूर्वी माझ्या शेतातील सोयाबीन व मोसंबीची विमा कंपनीला ऑनलाइन तक्रार करूनही त्यांच्याकडून अद्यापही पंचनामे झालेले नाही. त्यांना संपर्क केला असता त्यांनी ता कृषी अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसFarmerशेतकरी