शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:27 IST

मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

जालना / मठपिंपळगाव: मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खोदकाम करीत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.पोलीस सूत्रांनी सांगितले, की अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील कचरु दशरथ रत्नपारखे यांचे अपहरण झाल्याची घटना आठ जून २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा संशयितांवर गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास फारसा गांभिर्याने घेतला नाही. दरम्यान, वार्षिक तपासणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे अंबडला आले असता, मृत रत्नपारखे यांच्या आईने थेट महानिरीक्षकांकडे तक्रार करून आपल्या मुलाचा शोध लावण्याची मागणी केली होती. भारंबे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने शुक्रवारी गजानन सुदाम खेकडे व गणेश कारभारी जिगे (रा. मठपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कचरु रत्नपारखे यांचा खून करून मृतदेह मठपिंपळगाव शिवारातील एका विहिरीजवळ पुरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी शनिवारपासून संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू केले होते. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून पुन्हा जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले. दुपारनंतर खोदकाम करताना एक हाड सापडले. मात्र, सापडलेले हाड जनावराचे असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. सायंकाळी अंधार झाल्यामुळे खोदकाम थांबविण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकरणात आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.-----------त्या जागेची रचना बदलली.मारेक-यांनी ज्या विहिरीशेजारी खड्डा खोदून कचरु रत्नपारखे यांचा मृतदेह पुरला, ती विहीर एका नाल्याला लागून आहे.घटनेला तब्बल सात काही महिने उलटून गेले. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आल्याने या ठिकाणी माती व वाळू साचल्याने पूर्ण जागेची रचनाच बदली. त्यामुळे मारेकºयांनी मृतदेह नेमका कुठे पुरला, हे शोधणे कठीण झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.