शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:04 IST

पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम २०१८ मधील पिकाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर आहे. पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला असून, पीकविम्याची रक्कमही मिळत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणींचा डोंगर वाढत आहे.गतवर्षी पावसाच्या हलरीपणामुळे खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला होता. पावसाअभावी यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा अद्यापही पत्ता नसल्याने यंदाचाही खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गतवर्षीच्या खरिप हंगामात पेरणीनंतर शेतक-यांनी सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तूर व कापूस या पिकांसाठी लाखो शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ दुष्काळी स्थितीमुळे महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील पिकांची आणेवारी जाहीर केली़ नजर आणेवारी आणि अंतीम आणेवारीमध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली होती़ शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट असेल तर त्या भागातील शेतक-यांना विमा नुकसान भरपाई देण्यात येते़दरम्यान, राज्य शासनाने जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याने शेतक-यांना पीक विमा मिळण्याच्या हालचालींना वेग आला होता़ गतवर्षीच्या खरिप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडून जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ५०१ शेतक-यांना ६५ कोटी ७९ लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला होता. आजवर विमा कंपनीने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी व ज्वारी या पिकांचा विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख २३ शेतक-यांच्या खात्यावर ४५ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ मात्र, अद्यापही जिल्हाभरातील सव्वा लाखावर शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. पीकविम्यासाठी शेतक-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.निवेदन : विम्यापासून वंचित राहण्याची भीतीजालना : जालना तालुक्यातील गोलापांगरीअंतर्गत गोलापांगरी आणि गोलावाडी (गणेशनगर) अशी दोन स्वतंत्र महसुली गावे आहेत. परंतु पीकविमा भरताना गणेशनगर गावाचा समावेश नाही. त्यामुळे गणेशनगर या गावातील शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे.त्यामुळे गोलावाडी या गावाच्या नावात बदल करून शेतक-यांना पीकविमा भरण्यासाठी गणेशनगर या गावाचा समावेश करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नरेश अवघड, अक्षय गायकवाड, सचिन अवघड, एकनाथ जिगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र