शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सत्संग हा सुखी जीवनाचा मार्ग- भगवान महाराज आनंदगडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:36 IST

सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संसार मुळीच दु:खदायी नाही. मात्र आपल्या कमार्नं त्याला दु:खी बनवलं असून यातून मुक्ती हवी असेल सत्संगाशिवाय पर्याय नाही. कारण सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील माऊलीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील काल्याच्या कीर्तनात निरुपण करताना हभप आनंदगडकर महाराज बोलत होते.संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाचीया पोरे । आधी चोरी केली खरे ।। या अभंगावर आनंद गडकर महाराजांनी सुंदर असे विवेचन केले. पुढे ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र खरे तर इतके खडतर होते की आपण त्याची कल्पनाही करु शकत नाहीत. मात्र आजकाल आपणासारखे तर इतके दु:ख सहनही करु शकत नाही. संत संगत ही नेहमीच चांगला रस्ता दाखवणारी आहे. म्हणूनच आपणही याच मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, नंदाच्या मुलांनी चोरी केली म्हणून आपणही चोरी करावी, हे बरोबर नाही. ती संत महंत मंडळी होती, महान होती. त्यांनी खोडकरपणा म्हणून अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या मात्र आपण असला प्रकार करता कामा नये, त्यात यश नव्हे तर अपयशच येते, असेही शेवटी भगवान महाराजांनी सांगितले. गेले सप्ताहाभर दररोज काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दररोज सायंकाळी हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी हभप सोपान महाराज डोंगरे, ह. भ. प. नाना महाराज पोखरीकर, सावळेश्वर भजनी मंडळ आदींसह माऊलीनगर वासियांसह गावक-यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक