शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव मदत मिळाल्यासच समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:34 IST

तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : कापसाच्या काड्या झाल्या, सोयाबीन गेले, मका गेला, हातात काहीच आलं नाही. शासनाने तोकडी मदत दिली. साहेब अडचणींचा डोंगर आहे. तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.तालुक्यातील कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी विविध पिकांची पाहणी केली व शेतक-यांसमवेत संवाद साधला़ यावेळी या पथकाने गट नं २० मधील रामेश्वर बळीराम लहाने यांच्या शेतात मका पिकाची पाहणी केली. मक्याला अतिवृष्टीमुळे कोंब फुटले, पीक सडले. पिकासाठी एक लाखाचे पीककर्ज काढून खर्च केल्याचे संबंधित शेतक-याने सांगितले. येथील गट नं. १९ मधील धोंडीबा पांडुरंग जाधव यांच्या शेतातील कापूस, बाजरी या पिकांची पाहणी केली़ यावेळी या अतिवृष्टीमुळे कापसाच्या कवड्या झाल्या असून, या कापसाची वेचणीही करता येत नाही. बाजरीसुध्दा खराब झाल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी सांगितले़ यावेळी संगीता रमेश कान्हेरे या शेतकरी महिलेने अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाल्याचे सांगत शासनाने दिलेली ८ हजार रूपये हेक्टर म्हणजे सुमारे ३ हजार रू प्रती एकर ही मदत कमी आहे. यात आम्ही केलेला खर्चही निघत नाही. आमचे कर्जही तसेच असून, आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित अनेकांनी शेतक-यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या.या पथकात डॉ व्ही. थिरूपाज, डॉ. के. मनोहरण यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी