शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

संजय राऊत यांच्या प्रतिमेस मारले जोडे; शिवसेना शिंदे गटाचे जालन्यात आक्रमक निदर्शने

By विजय मुंडे  | Published: June 03, 2023 6:11 PM

शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तीव्र निषेध नोंदविला.

जालना : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर खा. संजय राऊत हे थुंकले होते. खा. संजय राऊत यांच्या या कृतीचा जालना येथील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शनिवारी निषेध नोंदवित राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तीव्र निषेध नोंदविला. त्यांच्या कृतीचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने हे जोडे मरो आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडीत भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमरे, महिला आघाडीच्या ढगे, संतोष मोहिते, फेरोज लाला तांबोळी, दिनेश भगत, नरेश खुदभैय्ये, कमलेश खरे, अजय कदम, योगेश रत्नापरखे, किरण शिरसाठ, सुशील भावसार, सखाराम लंके, भरत कुसुंदल, ॲड. अशपाक पठाण, दीपक वैद्य, राजू पवार, भोला कांबळे, पिटर खंदारे, चंदू निर्मल, ताहेर खान, जफर खान, गोपी गोगडे, संतोष जांगडे, निखिल पगारे, किशोर पांगकर, राम सतकर, मनोज धानुरे, संजय शर्मा, भूषण बनकर, आदित्य खंडागळे, आलम खान पठाण, महमूद कुरेशी, रमेश टेकुर, संताजी वाघमारे, विजय जाधव, सागर पाटील, किशोर शिंदे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

संताप आला तर हिमालयात जावे: अर्जुन खोतकरखा. संजय राऊत यांनी केलेले कृत्य हे त्यांची संस्कृती दाखविणारे असून, त्यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध केला जात आहे. कुणाचे नाव घेतले तर अशा प्रकारे थुंकणे हे त्यांची संस्कृती दाखविणारे कृत्य आहे. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत त्यांचा निषेध नोंदविला आहे. संजय राऊत यांना संताप आला तर इतरांच्या नावाने कशाला थुंकावे. संताप आला तर हिमालयात जावे, अंगाला भस्म लावून फिरावे. परंतु, अस संताप कोणत्या कामाचा असा सवालही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाArjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालना