शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:36 IST

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी तसेच अन्य गावामध्ये गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे अवैध वाळुचा उपसा सुरूच असतो.

ठळक मुद्देउशीरा का होईना कारवाईस प्रारंभ । ५०० पेक्षा अधिक ब्रास वाळू जप्त

अंबड / गोंदी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी तसेच अन्य गावामध्ये गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे अवैध वाळुचा उपसा सुरूच असतो. या संदर्भात वारंवार कारवाई करूनही वाळू माफिया कोणालाच जुमानत नाहीत. त्या पार्श्वभुमीवर शनिवारी सकाळ पासूनच महसूल आणि पोलिसांच्या पथकाने गोंदी जवळील गोदापात्रात धडक कारवाई करत ५०० ब्रास वाळुसाठे जप्त केल्याचे सांगण्यात आले.गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा केल्या जात असल्याच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वीही या प्रकरणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनीही यात लक्ष घातले होते. परंतु, नंतर पुन्हा जैसे थे उपसा सुरू झाला. हा उपसा सुरू होण्यामागे वाळू माफिया, राजकीय लागेबांधे आणि अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध हे देखील जबाबदार आहेत.शनिवारी अंबडचे उपविभागीय अधिकारी हजगल, तहसीलदार मनिषा मेने, मंडळ अधिकारी कुरेवाड, एस. ए. गाढेकर, राम कोंडगिर, श्रीपाद कोकटवार, कृष्णा देशमुख, कृष्णा मुजगुले, धम्मपाल गायकवाड, प्रवीण शिनगारे, सतिश पे्रमबत्ती, अशोक शिंदे, संदीप धारे अशा २० जणांनी गोंदी जवळील गोदावरी नदीपात्रात वाळुमाफियांनी साठविलेले वाळूचे ढिग जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रात टाकले. तसेच नदीपात्रा शेजारी असलेल्या वाळू साठ्यांचे ढिग ट्रकद्वारे गोंदी पोलिसांच्या हद्दीत आणून जमा केले आहे. हे जमा केलेले वाळुसाठे आणि नदीपात्रात टाकलेली वाळू ही जवळपास ५०० ब्रास म्हणजेच बाजार मुल्यानुसार १५ लाख रूपयांचे होत आहेत. या वाळुसाठ्यांचा लिलाव नंतर केला जाणार असल्याची माहिती मनिषा मेने यांनी दिली.दरम्यान, अशा प्रकारची कारवाई यापूर्वीही करण्यात आली होती. परंतु, त्याचा कुठलाही उपयोग होत नसून अधिकारी आणि वाळू माफियांच्या परस्पर संबंधामुळे हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे. एकुणच या वाळू उपसा प्रकरणामुळे प्रशासनाला रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न घटत आहे. शनिवारी झालेल्या कारवाईच्या वेळी तहसीलदारांनी जेसीबीच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात जाणारे रस्ते खोदून ठेवले आहेत.वाळुसाठाप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखलउस्वद परिसरात वाळू माफियांनी स्वत:च्या व अन्य वाहनांनी सरकारी जमीनीवर अंदाजे १९७ ब्रास, महादेव मंदिर परिसरात अंदाजे १८० ब्रास, मंठा व लोणार रस्त्यालगत ठिकठिकाणी ८०० ब्रास असा एकूण १ हजार १७७ ब्रास अवैधरित्या वाळूचा साठा करण्यात आला.तहसीलदार सुमन मोरे यांच्या सुचनेवरून मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गजानन भास्कर जाधव, अविनाश भिमराव सरोदे, दीपक शेषराव लोमटे, दीपक नायबराव राऊत, विनोद दामोधर जाधव, सुधाकर महादेव सरोदे, रंगनाथ नायबराव सरोदे व इतर (सर्व रा. उस्वद ता. मंठा) यांच्यावर भादंवि कलम ३७९, ३४ सह कलम ३ व ४ गौण खनिज कायदा प्रमाणे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सात जणांवर गुन्हातळणी : मंठा तालुक्यातील उस्वद येथील नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन फेर विक्रीसाठी ठिकठिकाणी वाळू साठे केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :JalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू