शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

तेरी भी चूप, मेरी भी चूप....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:38 IST

पोलिसांनी अवैध वाळू उपशाचे वाहन पकडले तर गुन्हा दाखल झाल्यास जामिनावर सुटता येईल, मात्र महसूल प्रशासनाने कारवाई केल्यास दंडात्मक कारवाई. शिवाय या पुढे वाळू तस्करी न करण्याचे शपथपत्राचे झंझट, म्हणून महसूलची दंडात्मक कारवाई नको, थेट पोलिसात गुन्हा दाखल करा, असा फंडा वाळू माफियांकडून वापरला जात आहे.

शहागड : पोलिसांनी अवैध वाळू उपशाचे वाहन पकडले तर गुन्हा दाखल झाल्यास जामिनावर सुटता येईल, मात्र महसूल प्रशासनाने कारवाई केल्यास दंडात्मक कारवाई. शिवाय या पुढे वाळू तस्करी न करण्याचे शपथपत्राचे झंझट, म्हणून महसूलची दंडात्मक कारवाई नको, थेट पोलिसात गुन्हा दाखल करा, असा फंडा वाळू माफियांकडून वापरला जात आहे.शहागडसह परिसरात वाळूचोर, पोलीस आणि महसूल विभागात सध्या कारवाईच्या नावाखाली ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ सुरू आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणा-यांवर कधी कारवाई होत आहे, तर कधी नियमांना पळवाटा दाखवून वाळू माफियांना अभय दिले जात आहे. परिणामी परिसरातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी-गंधारी, वाळकेश्वर, कुरण, गोंदी, कोठाळा, जोगलादेवी गोदावरी नदीकाठच्या या गावांलगत अवैध वाळूउपसा जोमात सुरू आहे. वाळू तस्करांना महसूल किंवा पोलीस पथकाने पकडल्यास कारवाईचा बडगा नको म्हणून वाहन जागेवर सोडण्यासाठी लाखभर रुपये देण्याची अवैध वाळू तस्करांची तयारी असते. अर्थपूर्ण हितसंबंधामुळे कित्येकदा वाहन कारवाई न करता सोडले जाते.----------महसूलचे झंझट कशाला ?महसूलच्या पथकाने वाळू तस्करांविरूध्द कारवाई केली तर तहसीलदारांमार्फत वाहन मालकास ३५ ते एक लाखांपर्यंत दंड आकारला जातो. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकड गेले तर यापुढे वाळू वाहतूक व उत्खनन करणार नाही, तसे आढळून आल्यास पकडण्यात आलेली यंत्रसामग्री व वाहन यांच्या बाजारमूल्यांपेक्षा अधिक रक्कम शासनाकडे भरू, असे 'शपथपत्र' द्यावे लागते. यासाठी चार-पाच महिन्यांचा कालवधी जातो. शपथपत्र दिल्यानंतर पुन्हा वाहन जप्ती झाल्यास ते सोडविणे कठीण जाते. त्यामुळे महसूलच्या दंडात्मक कारवाईच्या झंझटापासून वाळू तस्कर चार हात दूर राहणे पसंत करत आहेत. मागील काही महिन्यांत अशी अनेक शपथपत्रे महसूल पथकाने वाळूमाफियांकडून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.-----------------पोलिसांची कारवाईची बरीपोलिसांच्या पथकाने वाळू तस्करांविरूध्द कारवाई केली तर गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानंतर वकिलामार्फत जप्त वाहन न्यायालयातून सोडून घेतले जाते. यासाठी पैसा आणि वेळही कमी लागतो. शिवाय 'शपथपत्र'ची भानगड नाही. त्यामुळे महसूलच्या पथकाच्या कारवाईपेक्षा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला सोयीस्कर, असे वाळू तस्कर सांगताना दिसत आहेत.--------------'शपथपत्र' पत्र दिल्यानंतरही अवैध वाळू उपसा सुरू ठेवणा-यांवर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यास वाहन जप्तीची कारवाई करता येऊ शकते का, असे विचारले असता याबाबत उपविभागीय अधिकारी प्रवीण धर्माकर यांच्याशी चर्चा करून कारवाई करता येईल, असे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी प्रवीण धर्माकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.