संत ज्ञानेश्वर विद्यालय परिसरात वृक्षारोपण
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाई येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय परिसरात पोलीस उपनिरीक्षक संतोष घोडकेे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य माणिक दानवे, संजय गायके, संजय तोटे, श्याम तुपकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन
घनसवंगी : तालुक्यातील ज्या दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात १४ फेब्रुवारी रोजी कुंभार पिंपळगाव, २१ फेब्रुवारी रोजी तीर्थपुरी, २८ फेब्रुवारी रोजी रांजणी, ७ मार्च रोजी राणीउंचेगाव, १४ मार्च रोजी राजाटाकळी येथे हे शिबिर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव
जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. रोगराईमुळे उत्पादनात घट होण्याची भीतीही वर्तविली जात आहे.