शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटविणार रोटरीचा ‘सरजमीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:31 IST

रोटरी क्लब परिवारातर्फे जालन्यात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याच्या उद्देशाने ‘सरजमीन’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे दिनेश राठी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोटरी क्लब परिवारातर्फे जालन्यात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याच्या उद्देशाने ‘सरजमीन’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे दिनेश राठी यांनी दिली.रोटरी परिवाराचे आदेश मंत्री, दिनेश राठी, धीरेंद्र मेहरा, सुरेश मगरे यांनी मंगळवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी रोटरी क्लब आॅफ जालना, रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रल, रोटरी क्लब आॅफ रेनबो, रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.जालन्यातील दानकँुवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनी सायंकाळी ५ वाजता ‘सरजमीन’ हा देशभक्तीपर कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात दहा हजार लोकांचा सहभाग राहणार असल्याचे दिनेश राठी म्हणाले. ज्यात जिल्हा परिषद व खाजगी अशा विविध शाळांतील मुले, शिक्षक, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, बँकिंग इ. क्षेत्रांतील लोकांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात ५ शहिदांच्या कुटुंबियांना गौरविले जाणार आहे.कोलकाताचा ‘समन्वय समवेत’ समूहजालन्यात होणाºया ‘सरजमीन’ या कार्यक्रमात कोलकाता येथील ‘समन्वय समवेत’ हा चमू देशभक्तीपर गीतांसह इतर प्रात्यक्षिके सादर करणार आहे.१ तास ४० मिनिटे हा कार्यक्रम ८० पेक्षा अधिक सदस्य दृक-श्राव्य माध्यम, नृत्य आणि नाटिकेद्वारे सादर करतील.या समूहाने आतापर्यंत देशभरातील जयपूर, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अमरावती इ. ठिकाणी कार्यक्रम केल्याचे धीरेन मेहरा यांनी सांगितले.अत्याधुनिक तंत्राद्वारे सादरीकरणदानकँुवर महाविद्यालयाच्या मैदानावर अत्याधुनिक तंत्राद्वारे रंगमंच उभारला जाणार आहे. यामध्ये ध्वनी यंत्रणेसह विद्युत रोषणाई व इतर विविध साहित्य वापरले जाईल. असा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यती’ होणार असल्याचा दावा आदेश मंत्री यांनी केला.दहशतवादाविरुद्ध ‘सरजमीन’सध्या दहशतवादी कारवायांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. दहशतवादाला शह देण्यासाठी ‘सरजमीन’ हाच पर्याय ठरु शकतो. याद्वारे युवक, तरुण आणि प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.