शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

रोहयो; आठवडाभरात दोन हजार मजुरांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:58 IST

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मजुर होते, ती संख्या आता थेट सहा हजारांवर गेली आहे.

ठळक मुद्देजालना : स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मजुर होते, ती संख्या आता थेट सहा हजारांवर गेली आहे.जालना जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेची कामे ही १७२ ग्रामपंचायतमध्ये सुरू असून, त्या कामावर सहा हजार २०० एवढी आहे. या कामांमध्ये कृषी, वनविभाग तसेच रेशीम लागवडीचा समावेश आहे. या कामवरील मजुरांना २०३ रूपये दररोज हे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. दरम्यान, आतापर्यंत कुशल आणि अकुशल मजुरांवर एकूण ३२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती रोजगार हमी विभागाकडून देण्यात आली. जालना जिल्ह्यातून जालना शहर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईला कामाच्या शोधात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु बाहेरच्या शहरात जात असताना बहुतांश कुटुंब हे ग्रामपंचायतीला कल्पना न देताच स्थलांतर करत असल्याने प्रशासनाकडे नेमके किती कुंटुंब बाहेरगावी गेले आहेत, याचा तपशील मिळण्यास अडचणी येत आहेत.गावपातळीवर कामे नसल्याने जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत मिळेल ते काम करण्यासाठी ग्रामीण भागातील बेरोजगार युवक एकवेळचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था असल्यास केवळ १०० रूपये रोज या दरात काम करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. आयटीआयमध्ये तर बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत.तालुकानिहाय कामे आणि मजुरांची संख्याअंबड ६४ (५९१), बदनापूर ९३ (६३६), भोकरदन १७ (२०१), घनसावंगी १८६ (१६६९), जाफराबाद २६ (१४१), मंठा २८ (२२८), जालना २७ (५६४), परतूर २६० (२१९२) असे एकूण ७०३ ग्रामपंचायतींमध्ये ६ हजार २२ मजुरांची संख्या रोजगार हमी योजनेच्या कामावर आहे. कंसाबाहेरील आकडे हे त्या त्या तालुक्यातील ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या कामांची असून कंसातील आकडे मजुरांची संख्या दर्शवितात.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र