शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:51 IST

परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.थोरात कुटुंबीय सकाळच्या साखर झोपेत असतांना चार चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या बाजूने घरात प्रवेश केला. केशव थोरात यांच्या पत्नी स्वाती सकाळी पाणी तापवण्यासाठी उठल्याने त्यांना घरात चोरटे शिरल्याची चाहूल लागली. त्यांनी तातडीने याची माहिती पती केशव थोरात यांनी दिली. थोरात यांनी घरातील इतर दरवाजे बंद करण्याच्या आधीच चोरटे आत शिरले आणि चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद श्रीकांत केशव थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली.या तक्रारत म्हटले आहे की, पत्नी स्वाती या हिटर सुरू करण्यासाठी उठल्या असता त्यांना घराच्या चौकात एक चोरटा उभा दिसला त्यांनी ताबडतोब आरडाओरड केल्याने पती केशव व अन्य सदस्य जागे झाले. परंतु तो पर्यंत चार ते पाच चोरटे घरात शिरले होते. त्या चोरट्यांनी बैठकीचा दरवाजा बंद करून चाकूसह अन्य शस्त्राचा धाक दाखवून दागिने काढून घेतले.एकूण चार जणांनी घरातील कपाटातील सोने व महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून हिसकावून समोरच्या दरातून पोबराा केला.याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी उपविभागिय अधिकारी संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव यांनी भेटी दिल्या. श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारी