शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिरसगाव मंडप येथे दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST

भोकरदन : धारदार शस्त्राचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सिरसगाव येथील ...

भोकरदन : धारदार शस्त्राचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सिरसगाव येथील राजू सहाणे यांच्या शेतात शुक्रवारी मध्यरात्री घडली. दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील राजू सहाणे हे आपल्या कुटुंबीयांसह शेतातील घरात झोपले होते. शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चार दरोडेखोरांनी घराचा दरवाजा वाजवला असता, राजू सहाणे यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी लोखंडी गज, काठ्या तसेच विळ्याचा धाक दाखवून घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी घरातील कपाट व डब्यांमध्ये ठेवलेली रोख रक्कम ७५ हजार रुपये, २४ हजारांचे मणीमंगळसूत्र, गहू मण्यांची चार ग्रॅमची सोन्याची पोत, एक ग्रॅमची कानातील फुले, सहाणे यांच्या आईचे मणीमंगळसूत्र, चार ग्रामच्या बाल्या असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राजू सहाणे यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलीस निरीक्षक चत्रभूज काकडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे हे करीत आहेत.