शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता की मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

वालसावंगी : पारध ते वालसावंगी फाटा या अजिंठा- बुलडाणा महामार्गाला जोडणाऱ्या १३ किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील ...

वालसावंगी : पारध ते वालसावंगी फाटा या अजिंठा- बुलडाणा महामार्गाला जोडणाऱ्या १३ किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पाहता हा प्रवासाचा मार्ग की मृत्यूचा सापळा असाच प्रश्न वाहन चालकांसह प्रवाशांना पडत आहे.

भोकरदन तालुक्यातील पारध ते वालसावंगी फाटा हा रस्ता अंजिठा- बुलडाणा या महामार्गाला जाऊन मिळतो. या १३ किलोमीटर अंतराच्या मुख्य मार्गाची अतिवृष्टी आणि वाळू माफियांच्या अवजड वाहनांमुळे वर्षभरात वाट लागली आहे. वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठे बाजारपेठेचे गाव असून, परिसरातील वाढोणा, विझोरा, जाळीचा देव, धावडा, जनुनासह परिसरातील २५ गावांचा संपर्क या गावाशी असतो. परिसरातील शाळकरी, महाविद्यालयीन मुलेही शिक्षणासाठी येथे येतात. पारधपासून वालसावंगीकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. परंतु, वालसावंगी पर्यंत ७ किलोमीटर रस्त्यांचे काम अर्धवट आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी बांधकाम विभाग व खाजगी कंत्राटदाराकडून रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, काम निकृष्ट झाल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय बनत चालला आहे. या खड्ड्यातून वाहने चालविताना चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांसह प्रवासी करीत आहेत.

कोट

पारध ते वालसावंगी फाटा या १३ किलोमीटर मुख्य रस्त्यावरील काही काम अर्धवट राहिले आहे. शिवाय काही ठिकाणी खडी उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरूस्ती करावी.

संदीप लोखंडे, शिवसेना उपशहरप्रमुख, वालसावंगी

फोटो