शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटीप्रमुख कृष्णकुमारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:31 IST

स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना ही बियाणांची राजधानी असली तरी येथे यापूर्वी अनेक बोगस बियाणे प्रकरण पुढे आली आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात येथे एका बनावट बियाणे तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश कृषी विभाग (तांत्रिक) आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.काही महिन्यापूर्वी जालन्यातील कारवाईत संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता, या सर्व बोगस बियाणांचे धागेदोरे हे गुजरातपर्यंत पोहचले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी ही राज्य सरकारने एसआयटीकडे सोपवली होती. त्या एसआयटीचे प्रमुख पोलीसमहानिरीक्षक कृष्णकुमार यांनी आढावा घेतला.कृष्णकुमार यांनी दुपारी दोन ते अडीच तास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी शेळके, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कृष्णकुमार यांनी सांगितले की, बंदी असेले एचटीबीटी बियाणे अर्थात हर्बीसाईड टॉलरंटवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देऊन त्याचे उत्पादन आणि विक्रीवरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश कृष्णकुमार यांनी दिले. त्यांच्या या अचानक दौ-याने बियाणे क्षेत्रात खळबळ उडाली होती.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात बंदी असलेले आणि कुठल्याच कंपनीचे अधिकृत नसलेले एचएसबीटी बियाणांची जवळपास ६५७ पाकिटे तसेच अन्य बियाणे जप्त केले होते. दरम्यान गौर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, समाधान पवार यांनी स्वागत केले.तणनाशकाचाही परिणाम नाहीहे भारतात बंदी असलेले एचएसबीटी बियाणावर तणनाशकाचाही परिणाम होत नसल्याचे पुढे आले आहे. अत्यंत घातक असलेल्या या बियाणाने जमीनीचा पोत खराब होण्यासह पर्यावरणावरही विपरित परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यातील परिणांचा विचार करता यावर भारतात बंदी घातली आहे. या कपाशीचे उत्पादन एका अमेरिकन कंपनीने केले होते.्रयोगशाळेचा सकारात्मक अहवालहे बियाणे नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता, तेथून ते बोगस असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर जवळपास पाचही संशयित आरोपीविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांच्या विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती कृष्णकुमार यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी या माहितीवर समाधान व्यक्त करून कृषी तसेच पोलीसांनी बंदी घातलेल्या घातक बियाणांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या संदर्भात सूचना केल्या.

टॅग्स :fraudधोकेबाजीAgriculture Sectorशेती क्षेत्र