संतुकराव खोमणे महाविद्यालयात कार्यक्रम
जालना : तालुक्यातील नाव्हा येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात संस्था सचिव प्रदीप खोमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रवी खोमणे, अनिल कुलकर्णी, श्रीराम आटोळे, हरिभाऊ घुले, राहुल सुवर्णकार, पवन खोमणे, प्रा. अश्विनी क्षीरसागर, प्रा. चंद्ररेखा गोस्वामी, प्रा. स्वाती पुराणिक, प्रा. गजानन कदम, प्रा. निशांत गिते, सिद्धार्थ पारचा आदींची उपस्थिती होती.
नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या वतीने अभिवादन
जालना : नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रतन लाड, मयुर गोफणे, ज्ञानेश्वर घोटाळे, विष्णू जाधव, आसलम खान, माजित अली खान, संजू गायकवाड, राम गायकवाड, राहुल मुळेकर, फजलोद्दीन शेख, सुभाष कांबळे, दिलीप होगरे, रवि निकाळजे यांच्यासह पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.