शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीवर निर्बंध..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:46 IST

शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शहरातील मुख्याध्यापकांची बैठक पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शहरातील मुख्याध्यापकांची बैठक पार पडली.या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ १२ सीट वाहून नेण्याची परवानगी असणाऱ्या वाहनांमधून शालेय वाहतूक करावी असा निर्णय घेण्यात येऊन, रिक्षा चालकांनी पुढील १५ दिवसात नवीन किंवा भाडेतत्वावर १२ सीट बसणाºया वाहनांची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी संजय मेत्रेवार, एआरटीओ विजय काळे, सोनाली पोदार, हेरकर, परमेश्वर काटकर, चौधरी, पाटील यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केल्याचे सांगितले. तसेच त्याची अंमलबजावणी लवकरच जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले.यावेळी मेत्रेवार यांनी सांगितले की, आता यापुढे प्रत्येक शाळेत शहर वाहतूक सुरक्षा समितीची स्थापना करण्यात यावी, त्यात मुख्याध्यापक, पालकांचा एक प्रतिनिधी आणि एक वाहनधारकांचा प्रतिनिधी यात राहणार आहे.जेवढे सीट वाहून नेण्याचा परवाना त्या वाहनाला आहे, त्यापेक्षा जास्त प्रवासी, विद्यार्थी न बसविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी शहरातील मुख्याध्यपकांनी देखील त्यांना येणा-या अडचणी मांडल्या. दरम्यान विकास काळे यांनी यावेळी सांगितले की, जेथून बस अथवा अन्य गाडी विद्यार्थ्यांना घेऊन निघेल त्यांची स्वतंत्र यादी ही वाहन चालकांकडे असल्यास त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीस