शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान लेकींचा! टेंभुर्णी ग्रामपंचायततर्फे मुलींच्या नावाने बँकेत एफडी, नवरीला माहेरची साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:26 IST

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीची हटके योजना

- नसीम शेखटेंभुर्णी ( जालना) : मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून शासन वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवत आहे. शासनाच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीने सन्मान लेकींचा हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावाने बँकेत ठराविक रक्कम ग्रामपंचायत फिक्स डिपॉझीट करणार आहे.  तसेच विवाह होऊन जाणाऱ्या प्रत्येक नववधूला पैठणी साडी भेट देऊन सन्मान करणाा आहे. ही योजना शिवजयंतीपासून ग्रामपंचायतीने लागू केली आहे.

या उपक्रमात गावातील जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने दोन हजार शंभर रुपये एफडी केली जाणार आहे. याशिवाय गावातील ज्या मुलीचे लग्न होईल तिला माहेरचा आहेर म्हणून ग्रामपंचायतीमार्फत एक पैठणी साडी लग्नातच भेट दिली जाणार आहे. तिचा विवाह मंचावर गौरवही केला जाणार आहे. गावात लेकींचा जन्मदर वाढावा म्हणून ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम सुरू केल आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

मुलींसोबत संपूर्ण गावआपण स्वतः महिला असल्यामुळे मुलींसाठी काहीतरी करावे या हेतूने ग्रामपंचायतीसमोर हा विषय ठेवला. आणि सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले. एफ.डी. केलेली रक्कम मुलींना उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहसाठी कामी येईल. यामुळे निश्चितच मुलगा मुलगी हा भेद कमी होण्यासही मदत होईल. शिवाय सासरी जाणाऱ्या प्रत्येक नववधूला संपूर्ण गावातर्फे माहेरची साडी दिली जाणार असल्याने संपूर्ण गाव आपल्या सोबत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होईल.- सुमन म्हस्के, सरपंच, टेंभुर्णी.

मुलीच्या जन्माचे स्वागत होईलआधुनिक युगात जगात समाजात मुलगा-मुलगी हा भेद कायम आहे. ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमामुळे निश्चितच गावात मुलीच्या जन्माचे स्वागत होईल. जर गावात सन्मान झाला तर प्रत्येक घरात लेकीचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. टेंभुर्णी ग्रामपंचायतीने सुरू केलेला सन्मान लेकीचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.- आशा खांडेभराड, गृहिणी, टेंभुर्णी.

टॅग्स :Jalanaजालनाgram panchayatग्राम पंचायतWomenमहिला