पाथ्रूड शाळेत संविधान प्रास्ताविकेचे वाचन
जालना : पाथ्रूड तांडा जिल्हा परिषद शाळेत महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच शासन आदेशानुसार संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक नारायण माहोरे, सतीश श्रीखंडे, अनिल राठोड, विक्रम राठोड, सुभाष चव्हाण, लक्ष्मण राठोड यांच्यासह शिक्षक, पालकांची उपस्थिती होती.
सरस्वती भुवन प्रशालेत संविधान उद्देशिकेचे वाचन
जालना : शहरातील स. भू. प्रशालेत प्रमोद माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी क्रीडा शिक्षक सच्चिदानंद जहागीरदार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांना संविधानाची शपथ दिली. कार्यक्रमास सुनील रायठठ्ठा, मुख्याध्यापक मारूती पाटील, उपमुख्याध्यापिका ज्योती खैरनार, ॲड. सुनील किनगावकर, याडीकर, चौधरी, अंजली बडवे, देशपांडे, धनंजय पाटील, प्रदीप भावठाणकर, एस. यु. कुलकर्णी, सुरेश नंद, नीलिमा दंडे, जीवन आमले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.