शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधित १५ मातांच्या बाळांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:51 IST

मागील दोन वर्षात जिल्ह्यातील १८ एचआयव्ही बाधित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. यातील १५ बालकांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील दोन वर्षात जिल्ह्यातील १८ एचआयव्ही बाधित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. यातील १५ बालकांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. तर तीन बालकांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. आरोग्य विभागाच्या वतीने महिलांवर नियमितपणे केलेल्या उपचारामुळे बालकांना एचआयव्हीची लागण झालेली नाही.जिल्ह्यात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. एचआयव्ही बाधितांना सर्वसामान्य नागरिकासारखे जीवन जगता यावे, मातृत्व- दातृत्वाचा लाभ घेता यावा, त्यांच्याकडून जन्माला आलेल्या पाल्यांना एचआयव्हीची लागण होवू नये, यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना यश प्राप्त होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. येथील शासकीय रूग्णालयात एप्रिल २०१७ ते जून २०१९ पर्यंत शेकडो गर्भधारणा झालेल्या महिलांची तपासणी करण्यात आली. यात १९ महिला एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले. या महिलांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून विश्वासात घेवून त्यांच्यावर नियमित औषधोपचार करण्यात आले. यातील १८ महिलांची जून २०१९ पर्यंत शासकीय रूग्णालयात प्रसुती झाली. संबंधित महिलांच्या १५ बाळाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर तीन बालकांचा अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.एचआयव्ही ग्रस्त महिलेच्या प्रसुतीच्या ७२ तासानंतर नेव्हीरेपीन सिरप दिली जाते. त्यानंतर सहा आठवडे, बारा आठवडे, सहा महिने, बारा महिने व अठरा महिने यानुसार बालकांची तपासणी केली जाते. शेवटच्या तपासणीत बाळकाचा पॉझेटिव्ह व निगेटिव्ह अहवाल प्राप्त होतो.समाजात आमची एचआयव्हीग्रस्त म्हणून ओळख आहे. परंतु, आमच्या पाल्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे.हा आनंद गगनात न मावणारा असल्याच्या भावना एचआयव्हीग्रस्त मातांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :HIV-AIDSएड्सWomenमहिलाnew born babyनवजात अर्भक