जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरुवारी मृत्यू झाला. गुरुवारीच १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उपचार घेणाऱ्या ४० जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ३०३ वर गेली असून, आजवर ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ७४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात १९ हजार ४४७ जण संशयित आहेत. गुरुवारी २९२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २७८ अहवाल निगेटिव्ह आले, तर १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संस्थात्मक अलगीकरण कक्षात एकास ठेवण्यात आले आहे.